आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न, मिश्रावर तात्काळ कारवाई करा

| Updated on: Oct 11, 2021 | 12:40 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर घणाघाती टिका केली. तसेच, लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्राला भाजप वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 मुंबई : लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी रस्त्यावर उतरुन या आंदोलनही केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर घणाघाती टिका केली. तसेच, लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्राला भाजप वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Maharashtra Band | Pune | केंद्र सरकार ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक : रुपाली चाकणकर
Pravin Darekar | लखीमपुर हिंसाचार घटनेचा मविआ सरकारकडून राजकारण करण्याचा प्रयत्न