Santosh Deshmukh murder : बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे खाकीवरचा डाग पुसण्याचं आव्हान

| Updated on: Dec 24, 2024 | 10:29 AM

बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास अद्यापही सुरू आहे. पोलिसांना मुख्य आरोपी अजूनही सापडलेला नाही. या प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जिल्ह्यातील दहशतीच्या वातावरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवीन एसपी नवनीत कावत यांच्या नियुक्तीमुळे परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती अजूनही मुख्य आरोपी लागला नाही. चौकशी, घोषणा, नव्या एसपींची नेमणूक तर झालीये. पण पोलिसांचा हात मात्र रिकामाच आहे. तर त्यामागे कारण मात्र सांगितलं जातंय बीडमधल्या दहशतीच्या वातावरणाचं…. काही अपवाद वगळता बीडची पोलीस यंत्रणा कशी पोखरली गेलेली आहे, याचे अनेक दाखले सभागृहातही देण्यात आलेत. त्यामुळे नव्या एसपींना बीड भयमुक्त करण्यासाठी आधी स्वतःच्याच डिपार्टमेंटपासून सुरुवात करावी लागणार आहे. ज्या बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून झाला. जिथे कायद्याची रोज धिंड काढून व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जातात. आरोपानुसार ज्या ठिकाणी पोलिस आरोपींच्या घरी पोहोचून एफआयआर लिहितात. जिथे हत्येच्या आधीच्या दिवशी मुख्य आरोपी सोबतच पोलीस अधिकारी चहा पितात आणि जिथे दाव्यानूसार एसपींची नेमणूक देखील आरोपीच करतो. त्या बीड जिल्ह्यातल्या खाकीवरचा डाग पुसण्याचा आव्हान नवे एसपी नवनीत कावत यांच्यापुढे असणार आहे. भलेही कावतांची नियुक्ती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी झालेली असो. मात्र संतोष देशमुखांना न्याय देताना एसपी कावतांना जिल्हाभर वाळवी सारखी पसरलेली गुन्हेगारीची कीड मुळासकट संपवावी लागणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 24, 2024 10:29 AM
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत? वाल्मिक कराडला बेड्या ठोकणार?
परभणीत नेमकं काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीसोबत काय झालं? राहुल गांधींचा गंभीर आरोप