विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी, कारण काय?

| Updated on: Nov 06, 2024 | 1:03 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. तर बंडखोरी करणाऱ्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार भाजपकडून ३७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचारसभांचा धडाका सुरू असताना भाजपकडून मोठी अॅक्शन घेण्यात आली आहे. भाजपकडून ३७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने सांगितल्यानंतरही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपकडून बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई कऱण्यात आली आहे. भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे. बघा व्हिडीओ आणि यादी कोणा-कोणावर झाली कारवाई?

आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी – सतीश घाटगे
जालना – अशोक पांगारकर
गंगापूर – सुरेश सोनवणे
वैजापूर – एकनात जाधव
मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे
बागलान – जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
कल्याण – वरुण पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकूर
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
नेवासा – बाळासाहेब मरकुटे
सोलापूर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडकर
सावंतवाडी – विशाल परब