नापास तरीही बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात पठ्ठ्या फुल्ल पास

| Updated on: May 28, 2024 | 1:53 PM

अतिशय रंजक वाटावी अशी ही सत्य कथा असून तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली. दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात ११ व्या प्रयत्नात या मुलाने अखेर मॅजिक सक्सेस मिळवले

12 th फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटच्या कथानकाची बीडच्या परळी तालुक्यात पुनरावृत्ती झाल्याचे उदाहरण १० वी च्या निकालानंतर समोर आले आहे. अतिशय रंजक वाटावी अशी ही सत्य कथा असून तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली. दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात ११ व्या प्रयत्नात या मुलाने अखेर मॅजिक सक्सेस मिळवले आहे. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबीयालाच नाही तर संपूर्ण गावाला आनंद आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील डाबी गावचे रहिवासी असलेल्या सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा सन 2018 या वर्षात दहावीला होता. 2018 ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. वडील सायनस उर्फ नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत. संपूर्ण जीवन अतिशय कष्टात व बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवले आहे. काहीही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती. त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही तू पास होईपर्यंत परीक्षा देत रहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली.

Published on: May 28, 2024 01:53 PM
अब की बार 400 पार की तडीपार? महायुतीला महाराष्ट्रात किती जागा? अनिल थत्ते यांनी काय केली भविष्यवाणी?
एकनाथ शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?; संजय शिरसाट यांचं नेमकं उत्तर काय?