Maharashtra Board 12th Result : बारावीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही इयत्ता बारावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन पाहू शकता. mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवरही पाहू शकणार आहात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज २१ मे २०२४ रोजी निकाल जाहीर झाला असून हा बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने जाणून घेऊ शकतात. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. राज्यात १२ वीचा निकाल एकूण ९३.३७ टक्के लागला आहे. तर यंदा मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के इतका लागला आहे. ३.८४ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त असल्याने या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं दिसतंय. एकूण १३ लाख ८७ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही इयत्ता बारावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन पाहू शकता. mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवरही पाहू शकणार आहात