‘या’ जिल्ह्यातील विद्यार्थीनं बारावीत पटकावले 100 टक्के; सांगितला फ्युचर प्लॅन

| Updated on: May 21, 2024 | 4:06 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर झालाय. निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत.

Follow us on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या असून मुलींचा निकाल 95.44 लागला असून मुलांचा निकाल 91.60 लागला आहे. मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत 3.84 टक्के जास्त आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील तनीषा बोरामणीकर राज्यात पहिली आली आहे. तनीषा बोरामणीकर हिला बारावीच्या परिक्षेत तब्बल शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तनीषा बोरामणीकरच्या या यश संपादनानंतर तिच्या परिवराकडून कौतुक केलं जात आहे. टिव्ही ९ मराठीशी संवाद साधताना तनीषा बोरामणीकर हिने आपला फ्युचर प्लॅन सांगितला आहे. तनीषा बोरामणीकर म्हणाली, मला खूप छान वाटत आहे, मी फक्त 95 टक्के अपेक्षित धरले होते मात्र मला 100 मिळाले आणि राज्यात प्रथम आले हे माझ्यासाठी खूप छान आहे. यात माझे आई वडील कुटुंब आणि शिक्षक यांचे श्रेय आहे. मला भविष्यात यूपीएससी क्रॅक करायची आहे. आणि मी लगेच सीए परीक्षा देणार आहे.