Maharashtra budget 2024 : वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, अजित पवारांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला मिळणार लाभ?

| Updated on: Jun 28, 2024 | 4:08 PM

प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केली आहे. यामध्ये एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असे असून 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार

राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला होता, आता सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केली आहे. यामध्ये एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असे असून 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेमुळे पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तर महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत, असे दादांनी म्हटले.

Published on: Jun 28, 2024 04:08 PM