budget 2024 : तुम्ही 21 ते 60 वर्षाच्या आहात? मग दरमहिन्याला 1500 रुपये घेऊन जा, काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना?

| Updated on: Jul 08, 2024 | 5:56 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली.

“महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. आज अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना या योजनेची चांगलीच चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. दरम्यान, महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Published on: Jun 28, 2024 04:38 PM
Maharashtra budget 2024 : वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, अजित पवारांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला मिळणार लाभ?
Maharashtra Budget 2024 : ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?