Maharashtra Cabinet Expansion : 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

| Updated on: Dec 15, 2024 | 6:39 PM

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर आज शपथविधी सोहळा पार पडला. नव्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच अजित पवार गटाच्या पाच नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ यावेळी घेतली. सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही तीन-तीन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्यासह तीन कॅबिनेट एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

Published on: Dec 15, 2024 06:39 PM
Cabinet Expansion 2024 : भरत गोगावले यांच्या ‘कोट’ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी? पहिल्या विस्तारात महायुतीनं काय-काय साधलं?