मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन अन् मंत्र्यांचा शपथविधी
उद्या असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजता नागपुरात दाखल होणार आहेत.
येत्या १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपूरातच नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. येत्या १६ डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी १५ डिसेंबरला संध्याकाळी ४ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र आज राज्यपालांना महायुतीकडून देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरंतर १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. मात्र या मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी कोणा-कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? कोणाला यंदा डच्चू मिळणार हे उद्याच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. उद्या असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. यावेळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार असून शिंदेंच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणीदेखील उपस्थित राहणार आहेत.