राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? ‘वर्षा’वर रात्री उशिरा शिंदे-फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन तास वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. वर्षावर झालेल्या दोन तासांच्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची शक्यता....विशेष म्हणजे फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी शिंदेंची अजित पवारांसोबत चर्चा
गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन तास वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. वर्षावर झालेल्या दोन तासांच्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यासोबतच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावरही या दोन तासांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीआधी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती.
Published on: Jun 18, 2024 04:39 PM