देशात गढूळ आणि सुडाचं राजकारण सुरु - Uddhav Thackeray

देशात गढूळ आणि सुडाचं राजकारण सुरु – Uddhav Thackeray

| Updated on: Feb 20, 2022 | 7:53 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही (Prakash Raj) उपस्थित होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीनंतर के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.

‘महाराष्ट्र-तेलंगणा एकत्र मिळून काम करणार’ – CM K. Chandrashekar Rao
जसा पाण्याविना मासा, तशी सत्तेविना भाजपाची आवस्था; निलेश लंकेंचा भाजपाला टोला