मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी अयोध्या दौऱ्यावर; सर्व आमदार, खासदारांना दिले आदेश

| Updated on: Mar 25, 2023 | 3:41 PM

VIDEO | अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार आणि खासदार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय दिले आदेश?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या ५ एप्रिलला अयोध्येचा दौरा करणार आहेत. अयोध्येला जाऊन एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. तर शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरती देखील करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या शिवसेनेचे ४० आमदारही असतील. या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार आणि खासदार यांना येत्या ३ एप्रिल रोजी मुंबईत हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. दरम्यान शिवसेनेचे हे सर्व नेते रामल्ला आणि हनुमानगढीचं दर्शन देखील घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आणि खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे.

Published on: Mar 25, 2023 03:41 PM
भाजपचा राहुल गांधींना पलटवार, रविशंकर म्हणाले, ओबीसींचा अपमान केला
“पक्ष अन् चिन्ह मिळावं म्हणून साकडं घातलं होतं, आता नवस फेडायला अयोध्येला चाललोय”