VIDEO: प्रविण दरेकर, गिरीश महाजनांनी विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गाडी अडवली, पाहा नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. (cm uddhav thackeray)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा दुपारी विधानभवनातून बाहेर पडला. त्यावेळी विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. या चारही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या.
या शिवबंधन बांधूया
भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळया लगावल्या.
नार्वेकर आणि दरेकरांमधील संवाद असा :
मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का?
प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो.
मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत या, शिबबंधन बांधूया.
प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray car Stopped by BJP Leader Pravin Darekar and Girish Mahajan with others