SuperFast 50 News | 4.30 PM | 23 August 2021
कोरोनाच्या संकटामुळे मुंबईकरांचा लाडका सण असणारी दहिहंडी यंदाही साजरी करता येणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. दुसरीकडे दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली.
सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला