अजित पवार यांच्याशी संबधित ‘या’ प्रकरणावर १२ मे रोजी सुनावणी, पीएमएलए कोर्टात काय होणार निर्णय?

| Updated on: Apr 19, 2023 | 1:49 PM

VIDEO | विशेष पीएमएलए कोर्टात १२ मे सुनावणी होणार, अजित पवार यांच्याशी संबधित प्रकरण असल्याचे सुनावणीत काय होणार याकडे साऱ्याचं लक्ष

मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची आज असलेली सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात १२ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरूद्ध महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीनं आरोप पत्र सादर केलं होतं. यामध्ये अनेक आरोप हे अजित पवार यांच्यावर करण्यात आले आहेत. मात्र ईडीच्या आरोप पत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचं नाव नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, न्यायालयाने अद्याप आरोपींची दखल घेतली नाही. तर हे प्रकरण राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याने येणाऱ्या १२ मे रोजी सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 19, 2023 01:49 PM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यासह सरकार बरखास्त करण्याची काँग्रेस नेत्याने का केली मागणी?
विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार? संजय राऊत यांनी थेट सांगितला आकडा, म्हणाले…