Rinku Patil हत्याकांड : 10वीच्या परीक्षा केंद्रातच तरुणीला पेट्रोल टाकून जाळलं

| Updated on: Sep 13, 2021 | 6:06 PM

रिंकूसह वर्गातील सर्वांचेच चेहरे भेदरलेले दिसत होते. आरोपींनी रिंकूच्या अंगावर पेट्रोल ओतलं. रिंकूला मृत्यू डोळ्यासमोर दिसत असावा. काही क्षणातच त्यांनी काडी ओढली आणि रिंकूच्या अंगावर फेकली.

उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील (Rinku Patil) नावाच्या किशोरवयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. 30 मार्च 1990 रोजी घडलेल्या या घटनेच्या वाईट स्मृती जवळपास 31 वर्षांनंतरही अनेक जणांच्या मनात कायम आहेत. रिंकू पाटीलला उल्हासनगरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं होतं. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या महाराष्ट्रातील घटनांची आठवण काढताना उल्हासनगरची रिंकू पाटील, सांगलीची अमृता देशपांडे ही नावं प्रामुख्याने समोर येतात.

30 मार्च 1990 चा तो दिवस. दहावीची परीक्षा सुरु होती. परीक्षा केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची लगबग चालू होती. विद्यार्थ्यांच्या पालकांचीही केंद्राबाहेर गर्दी होती. विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यवेक्षक यांनी परीक्षा केंद्राचा परिसर फुलून गेला होता. 16 वर्षांची रिंकूही परीक्षेची पूर्ण तयारी करुन आली होती. पुढील काही मिनिटात आपल्यासोबत अघटित घडणार आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला नसेल.

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 13 September 2021
Hemant Nagrale | साकीनाका प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, आरोपीने घटनाक्रम सांगितला : हेमंत नगराळे