राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम निर्णय, यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या बातम्या
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निर्णय होणार, राज्यसह देशाचं या निर्णयाकडे लक्ष
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे जाणार का, आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे राज्यसह देशाचं या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकरता भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले असून २० फेब्रुवारी रोजी मेळावा घेणार असून भेटी-गाठीतून विविध समाजाचे प्रश्नही समजून घेणार आहे. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाने जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेला हजेरी लावणार आहे. मुख्यमंत्र्यांसह संजय राऊत आणि आंबादास दानवेही आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर येत्या ५ मार्चला उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौऱ्यावर असून खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी कोकणातील ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.