Ajit Pawar : अजितदादा यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा का दिला राजीनामा?
VIDEO | गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा का दिला? याबाबत चर्चांना आलं उधाण
पुणे, १० ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला? याबाबत सध्या एक न अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचं मार्गदर्शन घेऊ, असे बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी सांगितलं आहे. इतकेच नाही तर अजित दादा पुणे जिल्हा बँकेच्या प्रत्येक पंचावार्षिक निवडणुकीत सहभागी होत होते. मात्र आता त्यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देखील अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी दिली.
Published on: Oct 10, 2023 06:34 PM