Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणताय…मी पुन्हा येईन, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?
VIDEO | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय. या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या ट्वीटवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा राजकीय भूंकप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | भाजपकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन असं वचन देतानाचा व्हिडीओ पुन्हा ट्वीट करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. नवं महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय. या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर महाराष्ट्रात नेमकं काय होणार? पुन्हा मोठा राजकीय भूंकप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर होत. हा दौरा झाल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आल्याने चर्चेना उधाण आले आहे.