‘… तेव्हा राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनं का केली नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला सवाल
VIDEO | संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
मुंबई, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ महात्मा गांधींविरोधात बोललेंल खपवून घेणार नाही. संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते त्यांची स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देऊ नये. राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. तसेच जसं आता काँग्रेसची लोकं या वक्तव्याचा निषेध करत रस्त्यावर उतरतायेत, तसंच जेव्हा राहुल गांधी स्वातंत्र्य सावरकर यांच्याबाबत अतिशय गलिच्छ बोलतात तेव्हा त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. मात्र ते त्यावेळेस मिंधे होतात” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी