भारतातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सलमान खानला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
VIDEO | बॉलिवूड विश्वातील दबंग अभिनेता सलमान खान याच्यासाठी मुंबई सुरक्षित? देवेंद्र फडणवीस म्हणतात...
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलमान खानच्या सुरक्षेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, गडचिरोलीत सलमान खानला जीवे मारण्याच्या (Salman Khan Security) धमकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. अलीकडच्या काळात सलमान खानला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे धोके लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या सुरक्षेबाबत अपडेट दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सलमान खानची सुरक्षा सर्वोच्च पातळीची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटतं मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही. एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना सलमान म्हणाला होता की, असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे. आता, रस्त्यावर फिरणे आणि एकटे कुठेही जाणे शक्य नाही. याशिवाय तो म्हणाला की मला धमक्यांची भीती नाही आणि मला यूएईमध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटते तर भारतात मला भिती वाटत असल्याचं वक्तव्य सलमान खान याने केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.