CM Formula : मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत ‘हे’ दोन फॉर्म्युला निश्चित अन्…

| Updated on: Nov 25, 2024 | 11:11 AM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या २ फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तर 2-2-1 म्हणजेच या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. आता या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 25, 2024 11:11 AM
विधानसभेच्या दारूण पराभवानंतर ‘मविआ’चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
Ajit Pawar : ‘बच गया… दर्शन घे काकांचं..’, अचानक समोर येताच अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला खोचक टोला