Maharashtra election result 2024 : ‘या’ दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?

| Updated on: Nov 23, 2024 | 4:49 PM

पहिल्यांदाच मुंबईच्या माहीम मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. तर शिवडी मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना या दिग्गज नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ज्यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असा दावा केला होता तेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर दुसरीकडे कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही पराभव झाला आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच मुंबईच्या माहीम मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. तर शिवडी मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना या दिग्गज नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Published on: Nov 23, 2024 04:48 PM