लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ, पहिल्या टप्प्यातील मतदान, विदर्भातील 5 जागांचा समावेश

| Updated on: Apr 19, 2024 | 12:57 PM

देशातील १०२ जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा - गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे.

आजपासून पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान पार पडत आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. २१ राज्यांत १०२ मतदार संघात १ हजार ६२५ उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. नक्षली भागातसह संवेदनशील मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडचिरोली मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन मतदानाची वेळ असणार आहे. नागपुरात लोकसभा मतदारसंघात ६१ संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६३ संवेदनशील मतदान केंद्र आणि नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण ४५१० मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात २१०५ मतदारसंघ, तर रामटेकमध्ये २४०५ मतदान केंद्र आहेत. अति संवेदनशील बूथवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे , तर मतदान काळामध्ये शहरात सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून मतदार रामटेक आणि नागपूर लोकसभा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये टाकणार आहे, त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि पराजय कोणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

Published on: Apr 19, 2024 12:43 PM
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का पवार? सवाल करत उदयनराजेंचा शरद पवारांवर निशाणा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, ‘त्या’ नवदेवाची होतेय चर्चा