Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?
आपण कोव्हॅक्सिन लसीचे 40 लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे 50 लाथ डोस मागितले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगाने वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडून पंतप्रधान मोदींकडे महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींची मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.