Maharashtra New CM : … अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं!

| Updated on: Nov 29, 2024 | 5:17 PM

येत्या १ डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीसाठी भाजप आमदारांना आज संध्याकाळपर्यंत निरोप दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नवीन सरकार कधी स्थापन होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याचीही चर्चा सुरु आहे. त्यात आता ही माहिती समोर आली आहे. येत्या ५ डिसेंबरला महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथ विधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर ५ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्याचा शपथ विधीसाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय झाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, येत्या १ डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीसाठी भाजप आमदारांना आज संध्याकाळपर्यंत निरोप दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या गटनेता निवडीच्या बैठकीनंतर महायुतीच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या महायुतीच्या बैठकीनंतर दिल्लीतून आलेले निरीक्षक मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार आहेत. तर भाजपचे निरीक्षक मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Nov 29, 2024 05:17 PM
CM Oath Ceremony : ‘ते’ पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं
Eknath Shinde : ‘… तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार’, एकनाथ शिंदे अडून बसले; शिंदे गटातून सर्वात मोठी बातमी