Ajit Pawar NCP : नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती पडणार?

| Updated on: Nov 29, 2024 | 1:26 PM

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे.  यामध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता कोणाला किती मंत्रिपद आणि कोणती खाती मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे.

 महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे.  यामध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता कोणाला किती मंत्रिपद आणि कोणती खाती मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदावरून दावा सोडल्यानंतर गृहखातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृहखातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजप आग्रही आहे. जसं गृहखातं एकनाथ शिंदे यांना हवं तसं अर्थखातं अजित पवारांना हवं असलयाची चर्चा आहे. तर गेल्या अडीच वर्षात महायुती सोबत आल्यापासून अर्थखातं हे अजित पवारांकडे आहे. तर पुन्हा अर्थखातं अजित पवारांना देण्यास भाजपची काही अडचण नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महायुती सरकारमध्ये गेल्यावेळेप्रमाणे आताही दोन उपमुख्यमंत्री असू शकतात असा अंदाज वर्तवला जात असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्री पद, महिला आणि बालविकास, अल्प संख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा अशी खाती अजित दादांना मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 29, 2024 01:26 PM