Mumbai | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली
राज्य सरकारनं 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावता येणार नाहीत.
राज्य सरकारनं 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावता येणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणत्याही सभा, मोर्चे आणि आंदोलन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना 6 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी परिसरात येऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर, चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून कळवण्यात आलं आहे.