राज्यात निर्बध शिथिल होणार? 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती.
25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच 1 ऑगस्टपासून 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात. तर, राज्यातील 11 जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आहे.