लोकलचा फॉर्म्युला धार्मिक स्थळ, मॉलसाठी लागू होणार? टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ज्यांचे दोन डोस पूर्ण होऊन 14 दिवस झालेले आहेत त्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ज्यांचे दोन डोस पूर्ण होऊन 14 दिवस झालेले आहेत त्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. या बैठकीत लोकलच्या पॅटर्ननुसार राज्यातील धार्मिक स्थळ आणि मॉलसंदर्भात निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकलचा फॉर्म्युला धार्मिक स्थळ आणि मॉलसाठी लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.