राज्य सरकार यूक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देतंय : अमित देशमूख
राज्य सरकार युत्रेनहून राज्यात परतलेल्यांना मानसिक आधार देत आहे. जे मेडीकलचे विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतलेत, त्यांच्या शिक्षणाबद्दल विद्यापिठाकडून राज्यसरकारने अवलोकन करून अहवाल मागवला आहे, असं अमित देशमुख म्हणाले.
राज्य सरकार युत्रेनहून राज्यात परतलेल्यांना मानसिक आधार देत आहे. जे मेडीकलचे विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतलेत, त्यांच्या शिक्षणाबद्दल विद्यापिठाकडून राज्यसरकारने अवलोकन करून अहवाल मागवला आहे. या विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं होणार, आधार कसा मिळेल यासाठी युत्रेनच्या विद्यापिठाशी संपर्क करण्याच्या सूचना दिल्यात. भारत सरकारला या सूचना देण्यात येतील , नॅशनल मेडीकल काऊंसिल, मेडीकल संचालनालय संयुक्त कार्यक्रम जारी करु, असं अमित देशमुख् म्हणाले आहेत. विद्यापिठाला या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितलंय, पालकांशी विद्यार्थ्यांनी संवाद पूर्ण होत नाही तोपर्यंत बोलणं योग्य ठरणार नाही. सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, विद्यार्थी नैराश्यात जाणार नाही याची दखल घेणार असल्याचं अमित देशमुख म्हणाले.