Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून रुग्णवाहिका चालवली
जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालना जिल्हा परिषद मध्ये 21 रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर टोपे यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून, रुग्णवाहिका काही अंतर चालवत नेली
जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालना जिल्हा परिषद मध्ये 21 रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर टोपे यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून, रुग्णवाहिका काही अंतर चालवत नेली. राजेश टोपे यांनी उपस्थितांना कदाचित हेच दाखवून दिले असावे की, वेळ पडली तर आरोग्य मंत्री पण रुग्णवाहिका चालवू शकतात. कोरोना विषाणू संससर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेला 21 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. राजेश टोपे सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी देखील करत आहेत.