Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 21, 2021 | 3:31 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात कमी अधिवेशन घेतले जात आहे. संसदेचे अधिवेशन चालते. मात्र, आपल्याला काय होते. लोकशाही कुलूप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. महाराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये ‘रोक’शाही सुरू आहे. ‘रोख’शाहीत प्रत्येक गोष्टीला थांबविले जात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात कमी अधिवेशन घेतले जात आहे. संसदेचे अधिवेशन चालते. मात्र, आपल्याला काय होते. लोकशाही कुलूप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. महाराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये ‘रोक’शाही सुरू आहे. ‘रोख’शाहीत प्रत्येक गोष्टीला थांबविले जात आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. स्थगिती, खंडणी, लूट, भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहेत. ते कधीच पाहिले नव्हते. विरोधकांनी बोलू नये म्हणून त्यांचे एक वर्षासाठी निलंबित केले जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला अक्षरश काळीमा फासण्याचे काम होत आहे, असा घणाघात त्यांनी केला.