Special Report | महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या जवळ ?

| Updated on: Dec 30, 2021 | 11:03 PM

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

मुंबई : मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल. त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. “30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील” असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतु

Special Report | राज्यातल्या अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण
Special Report | ‘राष्ट्रवादी-भाजप युतीसाठी मोदींनी प्रयत्न केले’ ?