महाराष्ट्र म्हणजे जहागीरदारी भ्रमातून बाहेर पडावे : प्रवीण दरेकर
नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवरती टीका केली
नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवरती टीका केली, तसेच भाजपाच्या विरोधात जे बोलतील त्याचे असेल हाल होणार असल्याचे देखील अनेक नेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर ही फक्त महाराष्ट्रात होत नसून हे जिथं भाजपाची सत्ता नाही अशा ठिकाणी सगळीकडे होत असल्याचे महाविकास आघाडील नेत्यांनी सांगितले आहे. इतक्या वर्षे महापालिकेत सत्तेत असलेल्यांनी मिळालेल्या संधीचं सोन केलं की माती केली हे जनता ठरवेल. तसेच मोदींच्यावरती कोणीही टीका करण्याच कारण नाही कारण अवघ्या जगाला ते कोण आहेत माहिती आहे.