अखेर माझं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं : Prithviraj Patil

| Updated on: Apr 09, 2022 | 9:20 PM

माझं आता पुढचं स्वप्न ऑलम्पिक असेल, प्रतिस्पर्धी विशाल बनकरला शह देणं आव्हानात्मक होतं, मात्र यंदा गदा खांद्यावर आलीये याचा अभिमान आहे, अशी महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याने प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. माझं खूप वर्षापूर्वीचं स्वप्न पुर्ण झालंय. घरातचं कुस्तीचं वातावरण होतं. मात्र यंदा जोरदार तयारी केली होती. माझं आता पुढचं स्वप्न ऑलम्पिक असेल, प्रतिस्पर्धी विशाल बनकरला शह देणं आव्हानात्मक होतं, मात्र यंदा गदा खांद्यावर आलीये याचा अभिमान आहे, अशी महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याने प्रतिक्रिया दिली आहे. तर मी माझ्या वस्तादाचं स्वप्न पुर्ण करू शकलो नाही. मी चांगली तयारी केली होती मात्र थोडा घोळ झाला. पुढच्या वर्षी मी माझं स्वप्न पुर्ण करेन. घरातील व्यक्तींना समजावून सांगेन. मनात थोडी खंत आहे मात्र मी चांगली तयारी करेन, अशी प्रतिक्रिया यंदाचा उप महाराष्ट्र केसरी विशाल बनकरने दिली आहे.

Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्यानंतर Ajit Pawar संतापले-tv9
10 April 2022 | 10 एप्रिल 2022, रविवार राम नवमीचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ