‘तर महाराष्ट्र पेटून उठेल’, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांचा सरकारला इशारा
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत असून जर हा विषय लवकर सोडवला नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांनी दिला आहे
कोल्हापूर, ९ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील गेले ११ दिवसापासून उपोषण करत आहेत मात्र राज्य सरकार केवळ वेळकाढू पणा करत असून जर हा विषय लवकर सोडवला नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांनी दिला आहे. तर ओबीसीमध्ये असलेल्या पोटजाती मध्ये कुणबी मराठा ऐवजी फक्त मराठा असा उल्लेख करून हा मुद्दा निकाली लागू शकतो मात्र ओबीसी नेते या मुद्द्याला विरोध करत असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली. पुढे सुरेश पाटील असेही म्हणाले की, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. २००४ मध्ये आलेला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आशाप्रकारे या जीआरमध्ये सुधारणा करण्यात आली होती. मराठ्यांना कुणबीमध्ये सामाविष्ट करावं जेणेकरून त्यांना ओबीसींचं आरक्षण मिळू शकेल.