Video : साताऱ्याच्या आंबेघरवर आभाळ कोसळलं, दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 23, 2021 | 3:11 PM

 महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे

सातारा: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. (satara Landslide Maharashtra: 12 killed in satara landslides)

एकीकडे रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना, तिकडे साताऱ्यातही भीषण दुर्घटना घडली. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

Published on: Jul 23, 2021 03:08 PM
Raosaheb Danve | कोकणवासीयांच्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु :रावसाहेब दानवे
Raigad Taliye Landslide | महाडमध्ये तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळली, 38 जणांचा मृत्यू