Vijay Wadettiwar यांचा संभाजी भिडे यांना थेट इशारा; म्हणाले, ‘… तर जेलमध्ये टाकून चक्की पिसायला लावू’

| Updated on: Sep 17, 2023 | 11:02 AM

VIDEO | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य, राज्य सरकारवर हल्लाबोल करताना शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी दिला थेट इशारा; म्हणाले, 'काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये टाकू आणि...'

नागपूर, १७ सप्टेंबर २०२३ | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार अर्थात राज्य सरकार आणि शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. चिमूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विजय वडेट्टीवार हे बोलत होते. महाराष्ट्राचं सरकार हे 3 रिमोटनी चालत आहे, असे म्हणत राज्याच्या तिजोरीची लूट चालली आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर फक्त सत्ताधारी आमदारांचा विकास सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये टाकू आणि चक्की पिसायला लावू असा थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Sep 17, 2023 11:02 AM
Konkan Railway | सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे कोलमडली, काय कारण अन् किती तास उशिराने धावतेय ट्रेन?
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाड्याशी काही देणंघेणं नाही’, कुणी केला हल्लाबोल?