मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं…

| Updated on: May 13, 2024 | 10:36 AM

सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी सुबोध भावे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. इतंकच नाहीत त्याने सध्या राजकीय वातावरणारही भाष्य केलं. सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदान केलं. बघा काय म्हणाला...

देशभरासह राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून मतदान करण्यास सुरूवात केली अशातच सुप्रिसद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही पुण्यातून आपला मतदानाचा हक्क बजावला. सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी सुबोध भावे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. इतंकच नाहीत त्याने सध्या राजकीय वातावरणारही भाष्य केलं. आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल, असे सुबोध भावेने म्हटलं. सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदान केलं.

Published on: May 13, 2024 10:36 AM
तरच मतदान करणार… बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल