महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान, कुठं किती टक्के मतदान? कुठं झाली कमाल तर कुठं वाढलं टेन्शन?
महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद. आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाचपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय.
महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं तर बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालंय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५ जागांवर ६१.९ टक्के मतदान झालं. ८ जागांवर दुसऱ्या टप्प्यात ५९. ६ टक्के तर तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर ५३. ४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ टक्के तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय. काँग्रेसने आमदारांना मतदानाची खास जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणाम कोल्हापुरातील मतदानाच्या टक्केवारीवरून दिसतोय. बघा याच आकडेवारी संदर्भातील स्पेशल रिपोर्ट