देशासह महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात ‘या’ 11 हायव्होल्टेज जागांवर मतदान
१२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान पार पडतंय
आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात आज तिसरा टप्पा असून या तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ जागांवर मतदान पार पडणार आहे. देशातून एकूण १ हजार ३५१ उमेदवार तर महाराष्ट्रातील ११ लोकसभा जागांतून ५१९ उमेदवारी आपले नशिब अजमवत आहेत. आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बघा कुठे कोणा विरूद्ध कोण लढणार लोकसभा?
Published on: May 07, 2024 11:08 AM