मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, नेमकी कोणाला संधी?
महाराष्ट्रात एकूण १३ जागांवर लोकसभेचं मतदान पार पडलंय. मात्र पुन्हा एकदा मतदानाची आकडेवारी काही वाढलेली दिसत नाही. काल २० मे रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार कुठं किती मतदान झालं बघुया...
महाराष्ट्रात एकूण १३ जागांवर लोकसभेचं मतदान पार पडलंय. मात्र पुन्हा एकदा मतदानाची आकडेवारी काही वाढलेली दिसत नाही. काल २० मे रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार कुठं किती मतदान झालं बघुया… दक्षिण मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढाई होती. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४४.२२ टक्के मतदान पार पडलंय. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना होता. या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४८.२६ टक्के मतदान झालंय . उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना असे उमेदवार आमने-सामने होते. या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४९.७९ टक्के मतदान झालंय. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत होती. या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४७.३२ टक्के मतदान पार पडलं. तर उत्तर मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४६.९१ टक्के मतदान झालंय. बघा स्पेशल रिपोर्ट