समारंभ, शाळा 50% क्षमतेनं सुरु ठेवण्याची परवानगी द्या, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची CMकडे मागणी
लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये 50 टक्के क्षमतेने उपस्थिती, तसेच शाळा व शैक्षणिक संस्था 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.
मुंंबई : महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या कोरणा प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये 50 टक्के क्षमतेने उपस्थिती, तसेच शाळा व शैक्षणिक संस्था 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी करण्यात आलीय. महाराष्ट्र चेंबरतर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबरतर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.