Abdul Sattar | मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ, अब्दुल सत्तारांनी ग्रामसेवकाला झापलं
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले.
औरंगाबाद : जनतेच्या कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भिडणाऱ्या नेत्यांमध्ये काही नावं अग्रेसर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar). औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला.