Chhagan Bhujbal | …म्हणून अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही, हे सरकार मजबूत राहणार : छगन भुजबळ

| Updated on: Oct 18, 2021 | 11:55 AM

माझ्या कुटुंबावर 18 वेळा धाडी टाकण्यात आल्या. मी जेलमध्ये गेल्यानंतरही धाडी टाकण्यात आल्या. ये जनता है सब जानती है, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर प्रतिक्रिया दिली.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नागपूर दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांनी ईडी आणि आयकर विभागाकडून टाकण्यात येणाऱ्या धाडींवर भाष्य केलं. माझ्या कुटुंबावर 18 वेळा धाडी टाकण्यात आल्या. मी जेलमध्ये गेल्यानंतरही धाडी टाकण्यात आल्या. ये जनता है सब जानती है, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्र्यावर आणि ते मानत नसतील तर त्यांच्या नातेवाईकांवर यंत्रणाकंडून धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार असल्याचं भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय आता मध्यमवर्गींयांवरही आयटीच्या धाडी पडतात, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

Published on: Oct 18, 2021 11:55 AM
Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका
Chhagan Bhujbal | OBC साठी शिवसेना सोडली, जिवाशी खेळून ओबीसींसाठी पक्षांतर केलं : छगन भुजबळ