Nawab Malik Live | खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली : नवाब मलिक
समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे.
मुंबई : “समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप करत त्याच न्यायाने 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?”, असा खडा सवाल ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.