Vijay Wadettiwar | केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी : विजय वडेट्टीवार
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालंय. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.