अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कोल्हापूर: विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नाराजी दूर करण्यात सतेज पाटील यांना यश आलंय. त्यामुळं सतेज पाटील यांनी मतांच्या गणितात आघाडी घेतली असल्याचं बोललं जातंय.